Sunday, 21 July 2019

वसंत फुलला


नववधूचा साज लेऊनी
वसंत फुलला
वसुंधरेला सजवाया
वसंत ऋतू आला .

धरणीवरती चारी दिशांनी
ऋतूंचा राजा वसंत येऊनी
कोकिळेची मंजुळ गाणी गाऊनी
अमृताचे प्याले भरूनी ..वसंत ऋतू आला

पानगळ जाऊनी पालवी फुटली
सप्तरंगाची उधळण करूनी
मधुगंधाचे शिंपण करूनी
शेतात चैतन्याची गुर्मी घेऊनी ...वसंत ऋतू आला.

वृक्षांचे सांगाडे गेली बहरूनी
नवचैतन्याला जाग येऊनी
फुलाफुलांत अमृत भरूनी
भृंगराजाने मध गोळा करूनी..वसंत ऋतू आला

विरहात डुंबूनी गेलेल्या युव-युवतींना
प्रेम मिलना मादक काळ देऊनी
असा हा बसंत ऋतू आला
शृंगाराची कथा गेला सांगूनी ..वसंत ऋतू आला.

हिरव्यागार या मखमली शय्येवर
पानाफुलांची ओंजळी धरुनी
लावण्य नटवाया ही वसुंधरा आली
कोकिळाही संतुष्ट पंचमस्वर गाऊनी ...वसंत ऋतू आला
   ---✍️©®सौ.अनिता कळसकर
       कल्याण

No comments:

Post a Comment