Saturday, 13 July 2019

आजचा प्रवास

आज दिवस सुंदर उगवला. पहाटेच्या धुंद बरसणा-या सरींना उधाण आले होते.मनं अगदी प्रसन्न झाले.बागेवर नजर फेरली.फुलांच्या सुगंधाने वातावरण उजळून निघाले होते.कल्पना नसलेल्या गोष्टी आयुष्यात अचानकपणे घडून जातात.समजतं नाही काय करावे?पण या निसर्गाच्या सान्निध्यात राहून मनाला वेगळीच कलाटणी मिळते.पहा ना...
       प्रत्येक सुगंधी फुलाला जीवन ते किती असते?पण ते फुल किती आनंदाने आपल्याला जीवन जगायला शिकवते.जोपर्यंत झाडावर, वेलीवर आहे,तोपर्यंतच त्याचे आयुष्य असते. त्यांना ज्यावेळी झाडावरून तोडले जाते.तेव्हा त्या झाडाला ही वेदना होतचं असतात ना...!पण आपणाला त्या दिसतं नाही. कालांतराने त्या झाडांना नवीन पालवी फुटते.परत फळांफुलांची रेलचेल चालूचं होते....
    मानवाचे जीवन तरी कुठे वेगळे असते?प्रत्येक मोठ्या संकटावर मात करूनचं तर पुढे जायचे असते.आठवणी या मनाच्या एका कप्प्यात साठवून ठेवायच्या.व ईश्वराने दिलेले जीवनाचे दान आनंदाने पार करायचे.शेवटी काय घेऊन जाणार सोबत... असे विचार सकाळीच मनात आले व संपूर्ण दिवस आनंदाने घालवायचा ठरवले .
   या जन्मावर या जगण्यावर शतदाः प्रेम करावे.

  ✍️©® अनिता कळसकर

No comments:

Post a Comment