आजचा दिवस नेहमीसारखा उजाडला.एक आठवड्यानंतर पावसाने आज उसंत दिली होती.वातावरणात नाही म्हटले तरी अजूनही गारवा जाणवत नव्हता.खरचं का... आपली मने ही या वातावरणाशी जुळवून घेऊ लागलीत.त्यामुळे माणूस नात्यांना ही विसरु पाहतोय.मागच्या आठवड्यात पूर येऊन बरीच कुटुंब उद्ध्वस्त झाली. मनं अगदी खिन्न होते.पण आपल्यासाखी सामान्य माणसे मनात असताना ही काय करू शकतात?याचा विचार दिवसेंदिवस छळत जातो.आपल्याकडून काहीतरी मदत आपण कसल्याही स्वरूपात करू शकतो.हे ही काही थोडके नाही. पण प्रत्येक वेळी आपण ती बातमी बनवण्याची गरज वाटत नाही. कारण आपण ही या समाजाचे ऋणी आहोतचं ना..आज समाधान वाटले.फक्त विचार करून,प्रत्यक्ष आपण अशी कामे केल्यावरचे समाधान म्हणजे .......जीवनाचे सार्थक झाल्याचा आभास होतो.
✍️©®अनिता कळसकर
कल्याण.